Top News खेळ देश

सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 3 जणांना अटक!

पठाणकोट | काही दिवसांपूर्वी भारतीय माजी क्रिकेटर सुरेश रैना याच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हे प्रकरण निकाली लागलं असल्याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर अद्याप 11 जणं फरार आहेत. हे आरोपी टोळीमधील असून 3-4 जणं घर लुटण्याच्या हेतूने आले होते. यासाठी त्यांनी घरात घुसून घरातील लोकांवर हल्ला केला.

दरम्यान या हल्ल्यामध्ये रैनाच्या काकांचं निधन झालं होतं. शिवाय हल्ल्यानंतर दोन दिवसांत आत्येभावाचाही मृत्यू झाला होता. यामध्ये रैनाची आत्या आणि चुलत भाऊ जखमी झाला होता. याप्रकरणी रैनाने आरोपींना शिक्षा देण्याची मागणी पंजाब पोलिसांकडे केली होती.

आयपीएल तोंडावर असताना सुरैश रैना दुबईतून स्पर्धा सोडून माघारी परतला. पठाणकोटमधील थरीयाल येथे राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये रैनाच्या काकांचा आणि भावाचा मृत्यू झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नवनीत राणा

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 30 जणांसह बोट नदीत बुडाली

“आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा….”

…ही असंवेदनशीलता भयावह आहे; मोदी सरकारवर सुप्रिया सुळे संतापल्या!

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या