बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“30 विषाणूंपासून भविष्यात मानवाला धोका, त्यांच्यापासून मोठी साथ पसरू शकते”

नवी दिल्ली | जगात सध्या अस्तित्वात असलेल्या 887 झूनॉटिक व्हायरसची यादी एका वेब बेस्ड प्लॅटफॉर्मने तयार केली आहे. त्यातल्या 30 विषाणूंपासून भविष्यात मानवाला धोका होऊ शकतो आणि त्यांच्यापासून मोठी साथ पसरू शकते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधल्या संसर्गजन्य रोग तज्ज्ञ जोना मॅजेट यांनी 10 वर्षांहून अधिक काळ परिश्रम करून हे संशोधन केलं आहे. या संशोधनातूनच माणसासाठी घातक ठरू शकतील, अशा 30 विषाणूंची यादी तयार करण्यात आली आहे. या अभ्यासात 13 देशांतल्या 65 तज्ज्ञांचा सहभाग होता.

या विषाणूंचे तीन प्रकार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय किंवा क्षेत्रीय, अर्धवैश्विक अर्थात सेमी-ग्लोबल आणि वैश्विक अर्थात ग्लोबल हे ते तीन प्रकार आहेत. यापैकी काही विषाणूंमध्ये जागतिक महासाथ पसरवण्याची ताकद असल्याचं जोना मॅजेट यांचं म्हणणं आहे. या यादीतल्या 30 विषाणूंपैकी अनेक विषाणू वैश्विक साथीचं रूप धारण करू शकतात. कारण त्यांच्यामध्ये म्युटेशनची ताकद आहे. त्यामुळे अनेक नवे व्हॅरिएंट्स तयार होऊ शकतात. एकूण 887 विषाणूंपैकी माणसाला घातक ठरू शकतील अशा 38 विषाणूंवर अभ्यास झाला आहे. उर्वरित 849 विषाणूंवर संशोधन झालेलं नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. अशात WHO ने डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या व्हेरिएंटपैकी डेल्टा प्लस व्हेरिएंट आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग करणारा विषाणू असल्याचं WHO ने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करणार

‘दोन्ही डोस घेतलेत म्हणून निर्धास्त राहू नका, कारण…’; डेल्टा व्हेरिएंटबाबत WHO ने दिली महत्वाची माहिती

पुण्यात गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; कोरोना नियमांना हरताळ

“तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता, भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More