बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खडसेंनी दिलेला ‘तो’ इशारा खरा करुन दाखवला, भाजपला जबर धक्का!

जळगाव | एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये भाजपच्या गळतीला सुरूवात झाली होती. त्या धक्क्यातून भाजप सावरते न सावरते तोच आता 31  खडसें समर्थक आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जळगावमध्ये आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

भुसावळमधील 18 विद्यमान नगरसेवक तसेच 13 माजी नगरसेवक यांनी कुटुंबीयांसमवेत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात नाथाभाऊंनी आपल्या खास शैलीत भाजपला सज्जड दम दिला होता, “तुम्ही मला जेवढे छळणार तेवढे तुम्हाला महागात पडेल, अशा शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला होता. त्यानंतर, भाजपला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे.

“मला तुरुंगात कसं टाकता येईल याचा पुरेपूर प्रयत्न भाजप करत आहे. परंतु, माझ्या संपूर्ण कारकीर्दीत मी कधी कोणाचा एक रुपयाही खाल्लेला नाही किंवा दोन नंबरचे धंदेही केली नाहीत त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी मला फरक पडत नाही”, असं या कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, जळगावच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या परिवार संवाद कार्यक्रमात झालेल्या इनकमिंगचा राष्ट्रवादीला फायदा मोठा फायदा होऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

चुकीला माफी नाही… मुंबई पोलिसांनी रणबीरची गाडी घेतली ताब्यात!

मुंबई-पुण्यातील ही गोष्ट आता कोल्हापुरातही, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा!

शेतकऱ्यांनो सावधान… राज्याच्या ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता!

“मंत्री झाल्यावर मला कळालं, की त्यासाठी फार अक्कल लागत नाही”

गोपिचंद पडळकर अधिकच आक्रमक; अजित पवारांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट!

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More