बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण

नवी दिल्ली | देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. दिल्लीतील एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रकरण आहे गंगाराम रुग्णालयातील आहे. यातील पाच जणांना रुग्णालयत दाखल करण्यात आलं आहे. तर इतर डॉक्टर सध्या होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती आहे.

कोरोनाची लगाण झालेल्या 37 डॉक्टरांपैकी बहुतेक जण कोरोना रुग्णांवर उपचार करणारे होते. सर्व डॉक्टरांमध्ये काही हलकी लक्षणं असून कोणीही गंभीर स्थितीमध्ये नाही.

मागील 24 तासात दिल्लीत 7437 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कोरोनामुळे चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. आता दिल्ली कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 23181 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा वाढून 11157 वर पोहोचला आहे. मागील चोवीस तासांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 8.10 टक्के नोंदवला गेला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

दरम्यान, गुरूवारी दिवसभरात राज्यात तब्बल 56 हजार 286 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, गुरूवारी 376 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 21 हजार 317 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, मुलगी मात्र सुखरुप

पुढील 4 ते 5 दिवसात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

‘भविष्य मोलाचं पण जीव अनमोल आहे’; ‘एमपीएससी’ पुढे ढकलण्याची सर्व पक्षीय नेत्यांची मागणी

प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लसींचा तुटवडा जाणवला नसता- उदयनराजे भोसले

‘कोरोना लढ्यात राजकारण नकाे, राजकीय पक्षांना समज द्या’; उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More