बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

4 मित्रांनी सरकारी मदतीची वाट न पाहता उभारलं 50 बेड्सचं कोविड सेंटर!

बीड | कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये. अनेकांना बेडसाठी वणवण फिरावं लागतंय. तर अनेकांचा बेड आणि वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहून बीड जिल्ह्यातील 4 मित्रांनी 50 बेड्सचं कोविड सेंटर उभारलं आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर येथे आयडिएल इंग्लिश स्कूलमधील कोविड सेंटर लोकांसाठी वरदान ठरत आहे. या कोविड सेंटरमध्ये 12 ऑक्सिजन बेड्स आणि 38 जनरल बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी आलेल्या रुग्णाला 3 वेळचं अन्न सेंटरकडून पुरवलं जात आहे.

शाळेत बनवण्यात आलेल्या कोविड सेंटरला प्रकाश देसारडा, डॉ. भगवान सानप, डॉ. गणेश देशपांडे आणि अभिजीत डुंगरवाल यांनी नो प्रोफिट-नो लॉस या संकल्पनेवर उभारलं आहे. याठिकाणी आलेल्या रुग्णांकडून सरकारी हॉस्पिटलपेक्षा कमी शुक्ल आकारलं जातं आहे. यासाठी त्यांना 30 लाख रुपये खर्च आला.

रुग्णांकडून थोडे का होईना पैसे घेण्याचं उद्दिष्ट एवढं की इथं येणारा प्रत्येक रुग्ण उपचारानंतर सन्मानाने घरी परत जाऊ शकतो. दया भावनेतून त्याच्या उपचार झालेत असं त्याच्या मनाला वाटू नये, असं अभिजीत डुंगरवाल यांनी सांगितलं. या 4 मित्रांनी कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता केलेल्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा- देवेंद्र फडणवीस

“पवार साहेब, दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले पण…”

हसतं-खेळतं घर कोरोनामुळे उद्ध्वस्त; एकाच दिवशी दोन्ही मुलांचा मृत्यू

“मराठा आरक्षणासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा”; ‘या’ माजी विधानसभा अध्यक्षांची मागणी

सोनिया गांधींनी पुन्हा एकदा दाखवला ‘या’ नेत्यावर विश्वास सोपवली महत्वाची जबाबदारी 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More