Top News देश

4 वर्षांचा चिमुरडा पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये; तक्रार ऐकून पोलिसही हैराण

पंजाब | पंजाबमधील बस्सी पठाना इथल्या अवघ्या 4 वर्षांना मुलाने पोलिसांत धाव घेतली आहे. या चिमुकल्या मुलाची तक्रार ऐकून पोलिसही हैराण झाले होते.

4 वर्षांच्या ध्रुवच्या सायकलची घंटी कोणतरी चोरली. आपल्या सायकलला घंटी नसल्याचं लक्षात आल्यावर त्याने आई वडिलांना पोलिसांत तक्रार करण्याचा हट्ट धरला. पोलिसांत जाण्यावरून ध्रुवला पालकांनी फार समजावलं. मात्र त्याने ऐकून घेतलं नाही अखेर वडिलांसोबत तो तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला.

पोलिसांनी ध्रुवचं म्हणणं ऐकून घेतलं. शिवाय ध्रुवच्या वडिलांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान पोलिसांनी देखील या 4 वर्षांच्या चिमुकल्याच्या सायकलची घंटी शोधून देण्यात मदत करण्याचं आश्वासन दिलंय.

4 वर्षांच्या मुलांचा पोलिसांवर असलेला विश्वास पाहून पोलिस अधिकाऱ्यांनाही त्याचं कौतुक वाटलं. हा नव्या पीढीसाठी एक उत्तम संदेश असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”

‘…तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल’; दिशा सालियान प्रकरणाचा धागा पकडत राणेंची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना 100 पत्र; मात्र उद्धव ठाकरेंकडून एकाचंही उत्तर नाही!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण!

‘मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी’; कंगणा राणावतचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या