बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

44 किलो गांजा जप्त, आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार

ठाणे | कोपरी विभागात 4 मार्चला कोपरी पोलिस ठाण्याचे दोन पोलिस गस्त घालत होते. सव्वा तीनच्या सुमारास दोन व्यक्ती संशासस्पदरित्या 6 बॅग्स घेऊन रिक्षात ठेवण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी त्यांनी हटकल्यानंतर त्यांनी बॅगा तशाच टाकल्या आणि तिथून पळ काढला. त्यातून पोलिसांनी तब्बल 44 किलो गांजा जप्त केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक साळवी आणि पोलिस शिपाई शेंडगे ठाणे रेल्वे स्टेशनकडून आनंद सिनेमाघराकडे जाणाऱ्या मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी ही घटना घडली. इतक्या मोठ्या प्रमाणात हे अंमली पदार्थ कोण आणि कोणासाठी देणार होतं हे मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी बॅग उघडायला सांगताच दोन्ही आरोपींनी बॅग मध्ये कपडे असल्याचं सांगितलं आणि त्या बॅग तशाच टाकून अंधाराचा फायदा घेत फरार झाले. त्यांचा पाठलाग पोलिसांनी केला मात्र, ते हाती लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी रिक्षात ठेवलेल्या बॅगची तपासणी केल्यानंतर 6 बॅग्समध्ये 44 किलो गांजा सापडला. या मालाची एकूण किंमत 9 लाख 57 हजार 280 रूपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहेत. त्यामुळे या मागील सूत्रधार कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसच हा गांजा नेमका कोणाला देण्यात येणार होता हे देखील अजून समोर आलेलं नाही. मात्र कोपरी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌आमदार अरुण लाड यांनी विधानपरिषदेत पदवीधारकांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला अटक

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात ‘कोरोना’चा उद्रेक

मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More