नवी दिल्ली | दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणि आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दिल्यानंतर आता विरोधी पक्षाचे 5 मोठे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.
मार्क्सवादी कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते सीताराम येचुरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फक्त 5 जणांनाच भेटीची परवानगी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह अजून दोन नेते राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात आता विरोधी पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून आम्ही पवार साहेबांना भेटलो- रत्नाकर गुट्टे
शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये येण्यास तृप्ती देसाई यांना बंदी!
कृषी कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लागेल- मेधा पाटकर
“…तर तो खऱ्या अर्थाने डिसले गुरुजींचा सत्कार ठरला असता”
“टिकटाॅकवर ओळख झालेल्या महिलेकडून मुलावर बलात्कार”; वडिलांची पोलिसात तक्रार
Comments are closed.