बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??”

मुंबई | ठाकरे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता 29 फेब्रुवारीपासून 5 दिवसाचा आठवडा लागू होणार आहे. यावर मंत्री बच्चू कडू यांनी सरकारच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे.

कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार कशासाठी? आठवडा चार दिवसांचा केला तरी चालेल पण ते दोन दिवसांचं काम करतात का? हे अगोदर शासनाने तपासावं, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

जो चांगला कर्मचारी आहे त्याचा पगार वाढवा…. त्याला 4 दिवसांचा आठवडा करा पण अधिकारी आणि कर्मचारी जर काम करत नसेल तर त्याला पगार कशासाठी द्यायचा? त्याच्या कामाचं मुल्यमापन झालं पाहिजे, असंही कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पाच दिवसांचा आठवडा केल्याने सरकारी कर्मचारी आनंदित आहेत मात्र दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर सर्वसामान्यांना काही आक्षेप आहे आणि हेच आक्षेप कडू यांनी अधोरेकित केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीस दिल्लीत जाणार? म्हणताच चंद्रकांत पाटलांची तुटली खुर्ची! पाहा व्हिडीओ

रोहित पवारांची आमदारकी रद्द होणार??; रोहित पवार म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

झेंड्यात राजमुद्रा वापरणं राज ठाकरेंना महागात; राज्य निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस!

“आता… शिवसेनेला महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्रपक्ष काँग्रेस?”

लालूंचा नितीश कुमारांना फिल्मी स्टाईल टोला, म्हणाले…’तेरे दर पर सनम चले आये’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More