देश

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

नवी दिल्ली | भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. देशातील 6 व्यक्तींच्या नमुन्यांमध्ये नव्या विषाणू आढळून आले आहेत.

युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेले हे सहा जण यूकेमध्ये आढळलेल्या सार्स कोवि-2 च्या नवे स्ट्रेनने संक्रमित आहेत.

यासर्व 6 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, हे रुग्ण  देशातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

“लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये जातात; आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार”

पुणेकरांनो काळजी घ्या; ब्रिटनहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता!

“प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही”

वर्षा संजय राऊत यांचं ईडीला पत्र; केली ‘ही’ मागणी

“अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला असता”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या