बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#सकारात्मक_बातमी | दोन वेळा बायपास झालेल्या 74 वर्षीय पैलवानाची कोरोनावर यशस्वी मात

पुणे | कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. एकीकडे कोरोनामुळे बळी जात असताना वयाची शंभरी पार केलेल्या अनेकांनी कोरोनाला हरवल्याच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत.

बारामती तालुक्यातील पैलवान दादासो बडे यांची दोनदा बायपास सर्जरी झाली. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांना डेंगुचा आजार झाला होता. त्यावरही त्यांनी यशस्वीरित्या मात केली. पण पुन्हा तब्येत बिघडली. या दरम्यान दादासो बडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. यानंतर कुटुंबीय चिंतेत पडले.

बारामती येथील एका हॉस्पिटलमध्ये दादासो बडे यांना दाखल केलं. कोरोनाची लागण झाल्यानंतर आठ दिवसातच प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर पैलवान दादासो बडे यांना कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

मी कोरोनाची भिती बाळगली नाही. योग्य आहार घेतला. पैलवानकीचे शरीर आहे. काय होणार नाही हा विश्वास होता. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व उर्मी होती. त्यामुळे कोरोनाला हरवून जीवनाची कुस्ती पुन्हा जिंकली, असं दादासो बडे यांना सांगितली.

थोडक्यात बातम्या- 

अखेरपर्यंत ICU बेड मिळालाच नाही; NSG ग्रूप कमांडरचा रस्त्यातच मृत्यू

दिलासादायक! पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या आकडेवारी

आपल्या धन्याला वाचवण्यासाठी मॅरेथाॅन धावलेल्या लता करेंच्या पतीचा कोरोनाने मृत्यु

“नव्या संसदेसाठी, पुतळ्यांसाठी 20 हजार कोटी आहेत मग लसीकरणाला 30 हजार कोटी का नाहीत?”

‘किमान कोरोना काळात तरी….’; सर्वसामान्यांसाठी सुप्रिया सुळेंनी मोदींकडे केली ‘ही’ मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More