अमरावती | भाजपचे महाराष्ट्रातील एक नंबरचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे नेते रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा अमरावती पदवीधर निवडणुकीत पराभव झालाय.
रणजित पाटील हे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आहेत. ते याच मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते.
रणजित पाटील यांनी फेरमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून फेरमोजणी करण्यात आली. या सगळ्या कार्यप्रणालीला तब्बल 30 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला.
अखेर अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरल लिंगाडे विजयी झाले आहेत.
अमरावीत मतदारसंघाची निवडणूक इतकी अटीतटीची ठरेल अशी कुणी कल्पनादेखील केली नव्हती. अखेर या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरल लिंगाडे यांनी बाजी मारली.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘तिथेच उद्धव ठाकरे चुकले’; अजित पवार स्पष्टच बोलले
- ठरलं! ‘या’ दिवशी सिद्धार्थ-कियाराचं लग्न होणार थाटामाटात
- ना पेट्रोल,ना डिझेल आणि ना वीज आता कोणत्याही इंधनाशिवाय चालणार कार!
- गौतम अदानींना आणखी एक मोठा झटका!
- ‘या’ पक्षाच्या विष्ठेपासून जगातील महागडी काॅफी बनते!