बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धुळे | सध्या सोशल मीडियावर धुळ्यातील एका डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाळाला झोप यावी यासाठी डॉक्टर बाळाला हातात घेऊन गाणं म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आहे धुळ्याच्या निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिटमधील डॉ. अभिनय दरावडे यांचा.

डॉ. अभिनय दरावडे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या रुग्णालयात नुकतंच एक बाळ जन्माला आलं आहे. या बाळाचं वजन अवघं 900 ग्रॅम इतकं आहे. वजन कमी असल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस या बाळाची प्रकृती नाजूक होती. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर आता बाळाची प्रकृती व्यवस्थित झाली आहे.

हे बाळ रात्री अचानक मोठमोठ्यानं रडू लागलं. या बाळाला शांत करण्यासाठी त्याला झोप यावी म्हणून तिथे असलेल्या डॉ. अभिनय दरवडे यांनी त्याच्यासाठी एक सुंदर गाणं गायलं. ‘इस मोड से जाते है… कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम रस्ते’ या गाण्याच्या ओळी म्हटल्यानंतर बाळ रडायचं थांबलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमच्या NICU मधल्या 900 ग्राम वजनाच्या या चिमुकल्याला झोपच येत नव्हती! कालपासून त्याचा ऑक्सिजन निघालाय, दूध प्यायला लागलाय तशी ताकद आलीय त्याला! मग काय रात्री रडायला सुरुवात! NICU मधल्या आजूबाजूच्या दुसऱ्या पिटुकल्या बाळांना त्रास होईल इतक्या जोरात साहेबांनी रडायला सुरुवात केली! रडणं काही थांबेना! मग त्याला जरा बाहेर आणलं आणि गाणं म्हटलं, तसं ते शांत होऊन गाणं ऐकू लागलं, आणि नंतर दोन तीन गाणी म्हटल्यावर झोपी गेलं! इवलंसं आहे पण स्वतःला काय हवं ते बरोबर मिळवून घेतलं पठ्ठ्याने, असं डॉ. अभिनय दरावडे यांनी सांगितलं.

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘द बेस्ट ऑस्कर एव्हर’ म्हणत राम गोपाल वर्मांनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली

सोनूने कहर केला, 13 मुलांना नादी लावून लग्न केलं अन्…

पिंपरीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; दोन दिवसात दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू

‘माझी आईच जेवण बनवते पण 2 दिवस झाले ती झोपलीये,…’; आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिली मुलगी

सावध व्हा, या शहरात 341 चिमुरड्यांना कोरोनाची बाधा, काळजी घ्याच…!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More