बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भिडे पूल होणार इतिहासजमा, पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

पुणे | पुण्यातील मुळा-मुठा नदी प्रकल्प सुरू झाल्यानं डेक्कन ते नारायण पेठेला जोडणार भिडे पूल आता इतिहासजमा होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या PMC सुशोभीकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुळा-मुठा नदीच्या दोन्ही बाजूंचा पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे. असं पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं.

पुण्यामधील डेक्कन ते नारायण पेठेला जोडणारा भिडे पूल आता पाडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 5,000 कोटी रूपये कोटी खर्च आहे प्रकल्पाचे 11 टप्पे असून बंडगार्डन ते मुंढवा या दोन ठिकाणी अनुक्रमे 351 कोटी आणि 600 कोटी रुपये खर्च करुन काम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नदी सुधार प्रकल्पासाठी नदी पात्रातील रस्ते बंद करावे लागणार आहेत. नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाईल. नदीकाठचा रस्ता कायमस्वरूपी हटवला जाणार असल्यानं कोथरूड, सिंहगड रस्ता आणि वारजे येथील नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.

महानगरपालिकेच्या सुशोभिकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुळा-मुढा नदीच्या दोन्ही बाजूंचा पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे. पुण्यातील टिळक पूल ते म्हात्रे पूल नदीकाठचा रस्ता कायमस्वरूपी हटवला जाणार आहे. असे संकेत पुणे महापालिकेने दिले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

महेश मांजरेकर यांनी लेकीच्या अभिनयाविषयी सांगितली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

बाॅलिवूडला मोठा धक्का! सदाबहार अभिनेते रमेश देव यांचं निधन

स्मार्टफोनमध्ये डॉक्युमेंटवर डिजिटल स्वाक्षरी कशी कराल?; वाचा संपूर्ण प्रकिया

Breaking| 10 वी 12 वीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

“आम्ही पीत नाही त्यामुळे वाईन आणि दारुतला फरक शरद पवारांनी समजून सांगावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More