बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हाताने पकडायला गेली भलामोठा साप अन्…; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील बरेच व्हिडीओ हे पशु-पक्षांचे असतात. काही प्रेरणा देणारे असतात. तर काही खूपच विचित्र असतात. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

काही लोक खूप घाबरट असतात. म्हणजे त्यांच्या समोर झुरळ जरी आलं तरी लोक खूप घाबरतात. काही काही तर त्याला पाहून मोठ-मोठ्याने किंचाळतात. परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक मुलगी एका भल्या मोठ्या सापाला आपल्या हातात पकडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये एक तरूणी एका सापाला काठीचा किंवा इतर कशाचा उपयोग न करता स्वत:च्या हातांनी पकडत आहे. एका गाडीच्यामध्ये तो साप आला असल्यानं ती तो बाजूला उचलून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या सापाची उंची त्या मुलीच्या उंची एवढी असल्याचं दिसत आहे. ती मुलगी त्या सापाला आपल्या हातात दाबून धरत आहे. मात्र तो साप अत्यंत चपळ असल्यामुळे तो तिच्या तावडीत येत नाहीये.

परंतू ती मुलगीही हार मानत नसून. त्या सापाचं तोंड दोन्ही हाताने पकडून त्याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. काहीवेळानंतर साप शांत होतो. त्यानंतर ती त्याला लांब झाडांमध्ये सोडायला जात असल्याचं दिसत आहे. परंतू ती ज्या प्रकारे त्या सापाला पकडत होती. त्यावरून असं वाटत की, तिला साप पकडण्याचा सराव असावा. तसेच हा व्हिडीओ त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये काढला असल्याचं समजत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘मुंबई सागा’ चित्रपटात RSSची बदनामी?; चित्रपटातील ‘या’ दृष्यांवर संघाचा आक्षेप

आक्षेपार्ह भाषेतील त्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या….

घोड्यावर उभं राहून करत होता स्टंट अन्…, पाहा व्हिडीओ

लैंगिक शक्ती कशी वाढवाल?; ‘या’ अभिनेत्यानं यूट्यूबवर शेअर केला व्हिडीओ

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात टाळेबंदी, संभाजीराजेंना मोठा धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More