बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करीना कपूरचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात, बीडमध्ये तक्रार दाखल

बीड | प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर अलिकडे सतत चर्चेत असते. नुकतंच करिनाने गरोदरपणातील तिचा अनुभव एका पुस्काद्वारे सर्वांसमोर मांडला आहे. या पुस्तकाला तिने ‘करिना कपूर खान्स बायबल’ असं नाव दिलं आहे. या नावावर आक्षेप घेण्यात आला आहे.

करीना कपूरने नुकतेच ‘प्रेग्नसी बायबल’ या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या बाबतची माहिती स्वतः करिनाने तिच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन दिली आहे. या पुस्तकावर बायबल या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. बायबल शब्द वापरण्यात आल्यामुळे बीडमधील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने आक्षेप घेतला आहे.

पुस्तकाच्या नावातील बायबल हा शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे. याबद्दल बीडच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. करीना कपूरविरोधात तक्रार दाखल झाल्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या तक्रारीबद्दल अद्याप करीना कपूर आणि पुस्तक प्रकाशकांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघाकडून करण्यात आली आहे.

 

पाहा पोस्ट:

 

थोडक्यात बातम्या-

“एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

पुण्यातच तयार होतेय ‘भारतातली पहिली mRNA’ कोरोना लस; वाचा संपुर्ण माहिती

धक्कादायक! 12वीचे मार्क वाढवून देतो म्हणत शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

13 राज्यांतील सर्वेक्षणात ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर 1’

“सत्तेवर येऊन सात वर्षे झाले पण महागाईचा राक्षस आणखी मारता आला नाही”

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More