Top News देश

दिल्लीतील शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू

नवी दिल्ली | ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या वादामुळे हे आंदोलन आणखीनच चिघळलं आहे. अशातच पोलीस आणि शेतकरी यांच्याध्ये झालेल्या लाठीचारामध्ये एका तरूण शेतकऱ्याचा मृत्यु झाला आहे.

उत्तराखंडचा हा तरूण शेतकरी असून काही लोक त्याचं नाव नवनीत तर काही आणखीन सांगत आहेत. अद्याप त्या शेतकऱ्याच्या नाव समजू शकलेलं नाही. आयटीओ चौकामध्ये त्या तरूणाचा मृतदेह ठेवण्यात असून शेतकरी धरणे आंदोलनाला बसले आहेत.

पोलिसांनी केलेल्या लाठीचारामुळे आणि अश्रूधुऱ्याच्या माऱ्यामुळे तरूण शेतकऱ्याचा मृत्यु झाला आहे. आम्ही शांतता पद्धतीने आंदोलन करत होतो मग आमच्यावर लाठीचार का करण्यात आला, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन चालू केलं आहेत. आम्ही इथून उठणार नाही आहोत, असं तेथील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकला होता पोलीस कर्मचारी, मदतीसाठी एक शेतकरीच धावला!

रेणू शर्माने बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही- राहुल गांधी

धक्कादायक! आंदोलनकर्त्यांचा पोलिसांवर तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न, एक पोलीस जखमी

“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देेऊ”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या