बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी अन्…

नवी दिल्ली | रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशातील केंद्रपाडा येथील एका महिलेनं 2 डोकं आणि 3 हात असणाऱ्या एका चिमुकलीला जन्म दिला आहे. या बाळाच्या जन्मानंतर डाॅक्टर देखील हैराण झाले आहेत. या बाळाला कसलाही प्रकारचा त्रास होत नाही.

बाळाची आई दुसऱ्यांदा आई बनली आहे. यावेळी तिने दोन डोकी आणि तीन हात असणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे. बाळाचे दोन्ही तोंड आणि नाक चांगल्याप्रकारे विकसित झालं आहे. बाळाला दोन्ही तोंडातून खायला घातलं जातं आहे. शिवाय दोन्ही नाकांनी बाळाचा श्वासोच्छवास सुरू आहे.

बाळावर केंद्रपाडा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर विशेष देखभालीसाठी बाळाला कटक येथील सरदार वल्लभभाई पटेल पीजी इंन्स्टिस्टुट ऑफ पेडियाट्रिक्स याठिकाणी हलवण्यात आलं आहे. केंद्रपाडा येथील एका खाजगी रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला आहे. बाळाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपाचार सुरू आहेत.

दरम्यान, बाळाचे आईवडिल ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील राजनगर क्षेत्रातील कानी या गावचे रहिवासी आहेत. बाळाच्या वडिलांनी उपचारासाठी ओडिशा सरकारकडे मदत मागितली आहे. या बाळाला मदत करण्याची अद्याप कोणतीही घोषणा ओडिशा सरकारकडून केली गेली नाही. पण बाळाचं ऑपरेशन केलं तर बाळाला वेगळं करता येऊ शकतं असा विश्वास डॉक्टरांना आहे.

थोडक्यात बातम्या-

बंगाल निवडणूकीला नवं वळण; ममतांवर निवडणूक आयोगाची कारवाई

आता RT-PCR चाचणीत सापडेना कोरोना विषाणू; नव्या कोरोना स्ट्रेननं डाॅक्टराची वाढवली चिंता

महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट

ऑक्सिजन न मिळाल्याने एका तासात 10 रूग्णांचा मृत्यु; ‘या’ शहरातील धक्कादायक घटना

अर्धशतक केलं दीपक हुडाने पण ट्रोल होतोय कृणाल पांड्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More