बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंगावर काटा आणणारा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा व्हिडीओ

नागपूर | बाईकवरचे नियंत्रण सुटल्याने नागपूर येथील सावनेर येेथे तरूणाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बाईकस्वार तरूणाचा ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद (Accident caught in CCTV) झाला आहे. अथर्व काळे असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे.

बाईकस्वार तरूण ट्रकला ओव्हरटेक करत होता. यादरम्यान तरूणाचं बाईकवरचं नियंत्रण सुटलं आणि तो खाली पडला. तेवढ्यात ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीचं मृत्यू झाला आहे. सावनेर रोडच्या बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे.

जड वाहने शहरातून जात असताना त्यांच्या वेगमर्यादेवर कोणतही नियंत्रन नसतं. या कारणामुळे नागपूर शहरात अनेक अपघात घडत आहेत. हा अपघात 3 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडला आहे. नागपूरमध्ये सातत्याने असे अपघात घडत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये याआधीही असे भीषण अपघात घडले आहेत. वाहनचालकांच्या निष्काळजीमुळे सर्वात जास्त अपघात घडला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागपूर प्रशासनाने आता वाहतूक नियमांवर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

थोडक्यात-

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

मुंबईत लागणार लॉकडाऊन?; आयुक्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

खुल्लम खुल्ला प्यार!, औरंगाबादच्या रस्त्यावरील तरुण-तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

‘नितेश राणेंना त्यांच्याच घरात लपवलंय’; शिवसेना आमदाराचा धक्कादायक आरोप

‘या’ गोष्टीचा सनी लिओनीला आजही होतो त्रास, स्वत: केला खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More