मुंबई | ‘तांडव’ या वेबसिरीजवरुन वाद सुरू असतानाच ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजच्या विरोधात एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सुजित कुमार सिंह या नावाच्या व्यक्तीने ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजमध्ये सूनेचे सासऱ्यासोबत शारीरिक संबंध दाखवल्यामुळे आक्षेप घेतला आहे. सुजित सिंह हा मिर्झापूर येथाल रहिवासी आहे.
‘मिर्झापूर’ या वेबसिरीजमध्ये बीना त्रिपाठी नावाचं पात्र दाखवण्यात आलं आहे. बीनाचं तिच्या सासऱ्यांसोबत शारीरिक संबंध असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सत्यानंद त्रिपाठी असं या सिरीजमध्ये सासऱ्याचं नाव असतं. यावर सुजित सिंह यांनी आक्षेप घेत बिनय कुमार दास नावाच्या वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरुन न्यायालयाने मिर्झापूर वेबसिरीजच्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला नोटीस धाडली आहे.
दरम्यान, सुजित सिंह यांच्या म्हणण्यानुसार मिर्झापूर हा देशातील एक समृद्ध प्रदेश आहे. 108 शक्तीपीठांपैकी एक मानलं जाणार विंध्याचल मंदिर याच भागात आहे. अशा शहरातील महिलेचं पात्र हे सासरे आणि नोकराशी संबंध ठेवणारे दाखवून मिर्झापूरची बदनामी होत असून असं वाईट चित्र दाखवू नये अशी त्यांनी मागणी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘हा’ चित्रपट ठरला सर्वांचा बाप! रिलीझ होण्याआधी कमवले 348 कोटी
मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा- रतन टाटा
“राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर पुन्हा वाशी टोलनाका फोडू”
‘फासा आम्हीच पलटवणार’ देेवेंद्र फडणवींसाच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…
‘सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी पात्र नाही त्याऐवजी…’; या माजी खासदाराने केली सचिनवर टीका