बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक मंत्री सकाळ संध्याकाळ कुठली तरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय”

मुंबई | राज्यात मागील दिवसांपासून कथित ड्रग्स केसची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दसरा मेळाव्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधक असलेल्या भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजप राज्यात सत्ता नसल्याच्या कारणावरून ड्रग्स प्रकरणावरून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी ड्रग्स प्रकरणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

जर राज्याची बदनामी होऊ नये असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी ज्याचा जावई गंजेडी आहे म्हणूून पकडला गेला आहे. तो मंत्री लाथ मारून मुख्यमंत्र्यांनी हाकलला पाहिजे. राज्याची बदनामी या अशा मंत्र्यांमुळे होते, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

एक मंत्री सकाळ संध्याकाळ उठून कुठलीतरी तंबाखू घेतल्यासारखे बोलतोय. मंत्रिमहोदयांनी शपथ कशाची घेतलीय. ते करतायेत काय? कायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर रोज तुम्ही बोलतायत. बाकी पक्ष कान नाक डोळे बंद करून बसलेत का? असा सवाल शेलार यांनी सरकारला केला आहे.

दरम्यान, दारू आणि गुत्त्याच्या वसूलीत अधिकारी लावले जातात. त्यानंतर अधिकारी पोपटपंचीसारखं बोलतात. यातून राज्याची बदनामी होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की, त्यांनी देशाप्रमाणेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेतेचं राज्य अपेक्षित आहे, असं शेलार यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारचा नारा वेगळा दिसत आहे. काम करूंगा नही और करने नही दूंगा. स्वत: काम करायचं नाही आणि दुसऱ्या यंत्रणांना काम करू द्यायचं नाही, असं या सरकारचं धोरण आहे, अशी टीका शेलार यांनी राज्य सरकारवर केली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘बाळासाहेब थोरातांनी जाहीरपणे सांगावं की त्यांनी…’; विखे पाटलांचं थोरातांना आव्हान

भारताविरूद्ध पाकिस्तानचे ‘हे’ 11 खेळाडू मैदानात उतरणार; पाकिस्तानचा संघ जाहीर

‘मला विरोध करणाऱ्यांना जोड्यानं मारलं पाहिजे’; उदयनराजेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

‘तुझी मर्जी म्हणजे तुुझा अधिकार होऊ शकत नाही’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘हे आमदार, खासदार सो कॉल्ड जी माकडं आहेत…’, उद्यनराजे संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More