बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी लसीकरणाचा नवा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतले डोस

नवी दिल्ली | कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनूसार ऑगस्ट महिन्यात देशात 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. अशातच आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशात लसीकरणाचा नवा विक्रम झाला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात मेगा वॅक्सिनेशन कार्यक्रम ठेवण्यात आला. देशभरातल्या 1 लाख लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. को-विन अॅपवरील आकडेवारीनूसार आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दोन कोटी लोकांना लसीचा डोस देण्यात आला. देशभरात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं लसीकरण झालं आहे. यांसदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे.

शुक्रवारी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी एक कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर अवघ्या 100 मिनिटांत लसीकरणाचा आकडा 1.50 कोटी गेला. तर  संध्याकाळी 4 वाजता तोच आकडा दोन कोटींच्या पूढे गेला. आज संपूर्ण दिवसभरात लसीकरणाचा आकडा अडीच कोटीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोनाची दूसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भारतात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. सध्या कोरोनाचा धोका कमी असला तरी नागरिकांनी आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन् भर कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींनी काढला महिलेचा मास्क; पाहा व्हिडीओ

अभिनेता मनोज वाजपेयींचे वडिल रूग्णालयात दाखल, प्रकृतीबाबतची माहिती आली समोर

‘2024 ला पण तुम्हीच पंतप्रधान…’; अभिनेत्री कंगणा राणावतच्या मोदींना खास शुभेच्छा

‘…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केलं’; नाना पटोलेंची भाजपवर जहरी टीका

बीडमधील ह्रदयद्रावक घटना, कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More