बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवविवाहित जोडप्यावर काळाचा घाला, अपघातात वधूवरासह सहा जणांचा मृत्यू

रामपूर | उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. लग्न आटोपून घरी परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातला आहे. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

बिहारमध्ये लग्न आटोपून उत्तर प्रदेशमधील रामपूरमार्गे वधू आणि वर इको गाडीतून घरी परतत होते. नवविवाहित जोडप्याच्या या गाडीमध्ये इतर 4 जण देखील होते. रामपूरमध्ये आल्यानंतर एका आंब्याने भरलेला टेम्पोने वधूवराच्या गाडीला समोरच्या दिशेने जोरात धडक दिली.

या धडकेत कारमध्ये असणाऱ्या सहा जणांपैकी पाच जणांनी जागीच प्राण सोडले. तर नववधू गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह आपत्कालीन मदत तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. नववधूला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रुग्णालयात या वधूने प्राण सोडले.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व मृतलोक हे नोएडा येथे राहणारे होते. तर या कारला धडक देणारा टेम्पो मुरादाबाद येथून येणारा होता. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या –

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सक्रिय रुग्णांसह नवी रुग्ण संख्या आटोक्यात

काय सांगता! अवघ्या 23व्या वर्षी ‘ही’ महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांची अपेक्षा

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांना दीड लाखाची सूट, राज्याचं इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर

तुम्ही स्वतःला सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More