बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेकीच्या बुरखा घालण्यावरून टीका करणाऱ्यांना ए. आर. रेहमानचं जोरदार उत्तर

मुंबई | बुरखा घालणं हा माझ्या मुलीचा स्वतंत्र निर्णय आहे. तिने हा निर्णय घेण्यापूर्वी कोणालाही विचारलं नव्हतं. पुरूष बुरखा घालत नाही पण मला संधी मिळील असती तर मीसुद्धा बुरखा घातला असता, असं ए. आर. रेहमान यांनी म्हटलं आहे.

रहमान यांची मुलगी खतिजा हिचा बुरखा घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून खतिजाला बुरख्यात पाहिल्यावर माझा जीव घुसमटतो, अशी टीका बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केली होती. यालाच ए. आर. रेहमान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मला वाटतं हा धार्मिक गोष्टींपेक्षा ही एक मानसिक गोष्ट आहे. मला संधी मिळाली असती तर मी सुद्धा नक्कीच बुरखा घातला असता, असं रेहमान यांनी सांगितलं.

दरम्यान, कदाचित खतिजाला बुरखा घालण्यात तिचं स्वातंत्र्य जाणवत असावं, असं ए. आर. रेहमानने म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या- 

दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीमुळे फडणवीसांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात- मिटकरी

“तृप्ती देसाईंनी अकोल्यात येऊन दाखवावं, मुंडन करुन परत पाठवू”

महत्वाच्या बातम्या- 

कलमांतर्गत नियुक्त्या देता येतील पण सरकार का घाबरतंय??- फडणवीस

“त्यांनी आधी आपापसांत संवाद साधावा मग आम्हाला सुसंवादासाठी बोलावावं”

भाजपला नवी मुंबईत मोठा धक्का; 4 नगरसेवक शिवबंधन बांधणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More