मुंबई | महाराष्ट्रात सलग 4 दिवसांपासून पाऊस पडत आहे. IMD ने आता मुंबई आणि गोव्यात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने येत्या पाच दिवसांत मुंबई आणि गोव्यासह इतर अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढच्या 24 तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या आठवड्याभरात पडलेल्या पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे 100 सेंटीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. कुलाब्याचा पाऊसही 95 सेंटीमीटरपर्यंत पोहोचला आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचा अंदाज जुलैमध्ये पडलेल्या पावसाने सिद्ध केला आहे.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही शुक्रवारी रेड अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट भागात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल.
थोडक्यात बातम्या-
आलियाने सासू नीतू कपूर यांना दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाली…
सर्वात मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊतांना अटक होणार?
राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू!
अल्ट न्यूजचे संचालक मोहम्मद जुबेर यांना न्यायालयाचा दिलासा!
Comments are closed.