बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट, म्हणाली ‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्या’, पाहा व्हिडीओ

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर सुरुवातीला 20 – 25 आमदार घेऊन सुरतला पोबारा केला. त्यानंतर शिवसेनेत आमदार गळती सुरु झाली. एक एक आमदार करत नंतर तर मंत्री सुद्धा शिवेसेनेतून पळ काढत शिंदे गटाला जाऊन मिळाले. आणि बघता बघता शिंदे गटाच्या आमदारांची संख्या शिवसेनेच्या एकूण आमदारांच्या दोन तृतीयांश झाली.

सुरत (Surat)  नंतर शिंदे गटाच्या आमदारांनी गुवाहाटीत तळ ठोकला. त्यांचा गुवाहाटी (Guwahati) दौरा गाजला तो म्हणजे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या फोनमुळे. शहाजी बापूंनी आपल्या एका कार्यकर्त्याला फोन करुन तिकडचे वर्णन करताना काय झाडी, काय डोंगार काय हाटेल असं म्हंटलं. त्यानंतर ते महाराष्ट्रातील घराघरातच पोहोचले. महाराष्ट्रातील प्रत्येकाला एकदा तरी गुवाहाटीला जाऊन यावं असं वाटू लागलं आहे. तर मग लहान मुलांना का वाटू नये?

एका चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना, मला दिवाळीच्या सुट्टीत गुवाहाटीला फिरायला घेऊन जाणार ना, मला प्राॅमिस करा असं म्हंटलं आहे. अन्नदा डामरे (Annada Damare) असं या मुलीचं नाव आहे. अन्नदा ही रविवारी मुख्यमंत्र्याच्या नंदनवन या बंगल्यावर भेटायला आली होती. तिने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत अजब प्राॅमिस मागितलं. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

तुम्ही मदत करता तशी मी पण केली तर मला सुद्धा मुख्यमंत्री होता येईल का?, असा प्रश्न देखील अन्नदाने विचारला. तसेच मला पूर्वी फक्त नरेंद्र मोदी आवडायचे पण आता धर्मवीर पाहिल्यापासून तुम्ही सुद्धा आवडायला लागलात. अन्नदा रत्नागिरीची आहे. डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरीटीज आणि ट्रस्ट इंग्लिश मीडीअम स्कूल येथे शिक्षण घेत आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या – 

गेले ते बेंटेक्स,राहिले ते सोने म्हणणारे खासदार स्वत:च शिंदे गटात; ‘या’ कारणामुळे दिला सेनेला धक्का

मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटिओ टेस्टची गरज नाही, वाचा सविस्तर

‘मी तर स्वत:लाच मुख्यमंत्री समजतो’, शिंदे गटातील आमदाराचं मुख्यमंत्र्यांसमोरच मोठं वक्तव्य

‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनने झाप झापलं, म्हणाली…

‘त्यांनी मला चिठ्ठी दिली आणि मी भावाच्या धाकाने…’, किशोरी पेडणेकरांनी सांगितला प्रेमकहाणीतील ‘तो’ किस्सा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More