बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही’; दादरच्या राड्यावर ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई | आज शिवसेना पक्षाचा 55 वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मोलाचं मार्गदर्शन करण्याबरोबरंच चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी ठाकरे यांनी दादरमध्ये झालेल्या राड्यावर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना प्रमुखांचं जुनं भाषण सध्या व्हायरल होत आहे. त्यातलं एक वाक्य ‘त्याचा फटकन आवाज आला, तर आपला काडकन आवाज आला पाहिजे’. हे भाषण दोन दिवसापासून सगळीकडे का व्हायरल होत आहे, हे ज्याचं त्याला माहिती आहे. याला म्हणतात शिवसैनिक. ही शिवसैनिकाची ओळख आहे.

असं असलं तरी देखील फक्त हाणामाऱ्या करणं, खुनखराबा करणं हे आपलं काम नाही. रक्तपात करणं हा शिवसैनिकाचा गुणधर्म नाही. अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही. पण ही ओळख जर कुणी मुद्दाम करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकांची ओळख अनेकांना आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच भाजपवर निशाणा साधताना ठाकरे पुढे म्हणाले की, भाजप सत्तेसाठी कासावीस झाला आहे. या नेत्यांना सत्तेची पोटदुखी झाली आहे. सत्ता नाही म्हणून त्यांचं पोट दुखत आहे. यांना मीच राजकीय औषध देणार आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर भाजप काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“सत्तेची पोटदुखी झालेल्यांना राजकीय औषध मीच देणार आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली; 895 संशयित कोरोनाबाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह

‘घरातून एवढं काम होतंय, बाहेर पडलो तर…’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

“बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या”; ‘या’ मुख्यमंत्र्यांची महत्वाची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More