मुंबई | चेंबूरमध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्याने आधी पेपर दिला आणि त्यानंतर आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार केलेत. संदेश साळवे असं या मुलाचं नाव आहे. संदेशच्या वडिलांचे सोमवारी रात्री अचानक निधन झाले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा दहावीचा पहिला पेपर होता.
जर पेपर दिला नसता तर वर्ष वाया गेलं असतं. त्यामुळे या विद्यार्थ्याने पहिला पेपर दिला. त्यानंतर वडिलांचे अंत्यसंस्कार केले. सर्वच स्तरातून या विद्यार्थ्याचं कौतुक केलं जात आहे.
संदेश हा चेंबूरच्या टिळक नगरमधील पंचशील नगरमध्ये राहतो. त्याची आई, बहिण, आजी-आजोबा आणि मृत वडील राहत होते. संदेशचे वडील परमेश्वर साळवे हे हाऊस किपिंगचं काम करत होते. तर त्याची आई घरकाम करते. परमेश्वर यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते.
दरम्यान, अखेर समोवारी रात्री त्यांचे निधन झाले. दुसऱ्या दिवसापासून दहावीचे पेपर सुरु होत असल्यामुळे संदेशने पहिला पेपर दिला आणि त्यानंतर वडिलांचे अंत्यसंस्कार केलेत.
ट्रेंडिंग बातम्या-
“आपले पंतप्रधान कधी कोणती नाट्यछटा सादर करतील याचा नेम नाही”
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाला कॉपीराईटचा फटका!
महत्वाच्या बातम्या-
CAA ला विरोध करणाऱ्या ‘या’ भाजप नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
आरोग्य सुविधांवर खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी? – डॉ. अभय बंग
दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही मोफत वीज; ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा
Comments are closed.