बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची तिसरी लाट आल्यास इतक्या लाख जणांना संसर्ग होण्याची शक्यता”

मुंबई | राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लोटेविषयी राज्याच्या आरोग्य खात्यानं काही अनुमान काढले आहेत.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगानं राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार येणार आहे. सरकारकडून संभाव्य तिसऱ्या लोटेसाठी तयारी सुरु झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट आली तर 50 लाख जणांना संसर्ग होण्याची शक्यता राज्याच्या आरोग्य खात्यानं वर्तवली आहे. यामध्ये 25 लाख जणांना शासकीय रुग्णालय आणि करोना केंद्रात उपचार करावे लागतील. त्यापैकी साडेतीन टक्के म्हणजे आठ हजार 740 बालकांना बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावे लागतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

दरम्यान, गर्दी वाढली आणि नियम पाळले गेले नाहीत तर एक किंवा दोन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्याची भीती टास्क फोर्सनं व्यक्त केली. त्याची गंभीर दखल घेत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आतापासूनच आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे शहरी आणि ग्रामीण भागात उपलब्धता आणि पुरेसा साठा राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

कौतुकास्पद! कोरोनामुळे अनाथ झालेल्या दोन चिमुकल्यांची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारली

लसीकरणात महाराष्ट्राने मारला टॉप! देशात 3 कोटी लसीकरण करणारं पहिलं राज्य

‘किस करणं मराठी अभिनेत्रींना शोभतं का?’, ट्रोलर्सना तेजस्विनी पंडितचं उत्तर

“आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश”

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीवरून शरद पवारांची पाटलांवर टीका; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More