बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीएमसीने काढलेल्या ‘या’ ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण…

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग परिणामी कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. लसीकरणाला सुरवात झाली मात्र, लसींचा अभाव असल्यामुळं ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. आता लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढत लस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मुंबईकरांना लवकरात लवकर कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यात येईल.

बीएमसीने काढलेल्या या ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला असल्याचं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे. मात्र, असं असलं तरी बीएमसीने या टेंडर प्रक्रियेला 1 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मनपाने सांगितलं की, लस पुरवठा करण्याच्या बाबतीत मुंबई मनपाने काढलेल्या ग्लोबल टेंडरला अजून 3 पुरवठादारांचा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे एकूण संभाव्य पुरवठादारांची संख्या 8 वर पोहोचली आहे. नवीन आलेल्या पुरवठादारांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे त्यामुळे या टेंडर प्रक्रियेला 1 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या 8 कंपन्यांपैकी सात पुरवठादारांनी स्पुटनिक V तर एका पुरवठादार कंपनीने स्पुटनिक लाईट या कोरोना लसींचा पुरवठा करण्यास तयारी दाखवली आहे. तर, अजून एका कंपनीने अ‍ॅस्ट्रेझेनेका, फायझर या लसींचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे. मुंबई मनपाकडून 12 मे 2021 ला ग्लोबल टेंडर काढण्यात आलं होतं. त्यानंतर 18 मे पर्यंत 5 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला, आता आणखी तीन कंपन्यांकडून लस पुरवठा करण्याबाबत प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, फायझर कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही केवळ केंद्र सरकारलाच लस पुरवठा करू शकतो. इतरांना लस पुरवठा किंवा आयात करण्यास अजून अधिकृत परवानगी नाही. भारत सरकारसोबत राष्ट्रीय वापरासाठी लस उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं आम्ही चर्चा करत आहोत. तर, या कंपन्यांकडून किती दिवसात लस पुरवठा होईल? किती संख्येनं लससाठा पुरवला जाईल? लसीचे दर या संदर्भातील अटी आणि शर्थी या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन मनपा लससाठा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरवठा करत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ ठिकाणी सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण!

सावधान! कोरोनानंतर लहान मुलांना ‘या’ आजाराचा धोका

पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट, परंतू मृतांच्या संख्येत वाढ

“इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More