बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोक्का’ लागलेल्या महिला वकिलाची ससूनच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

पुणे | मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अॅड.दिप्ती सरोज काळे यांना अटक झाली होती. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 3 दिवसांपुर्वी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. पण त्यांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यानं त्यांनी पुण्यातल्या ससून रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी ससूनच्या आठव्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास काळे या तेथील स्वच्छतागृहामध्ये गेल्या त्यानंतर तिथुन त्या 20 ते 25 मिनीटं बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा काळे यांनी स्वच्छतागृहातील खिडकीच्या काचा काढून आठव्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.

पुणे पोलिसांनी काळे व तिच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. काळे यांच्या साथीदारांनी मागील दहा वर्षांपासून कट रचून खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, बनावट व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे केले होते.

दरम्यान, दिप्ती सरोज काळे यांच्यासह निलेश उमेश शेलार याच्याविरुद्ध देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. या दोघांना पोलिसांनी 3 दिवसांपुर्वी अटक केली होती.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनामुळे निधन

पुण्यात थेट फेसबुकवरून दारूची विक्री; सापळा रचून आरोपीला अटक

आसाम हादरले! 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

चिंता वाढली! देशात कोरोना मृ्तांची संख्या 2 लाख पार; रूग्णांसह मृत्युदरही वाढला

‘मोदीजी कृपया राजीनामा द्या…’; कंगणाचं ते ट्विट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More