बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! वरातीसोबत आलेल्या तरुणाने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

पाटणा | बिहारमधील जहानाबाद येथे संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नासाठी आलेल्या वरातीमधील एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा बलात्कार केला असल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गावातील एका लग्ना निमीत्त आलेल्या लग्न वरातीतील एका व्यक्तीने घरात शिरुन अल्पवयीन मुलीचा बलात्कार केला आहे. संबंधित मुलीच्या कुटुंबातील बरेच सदस्य ग्रामस्तांच्या घरी जेवायला गेले होते. यादरम्यान घरात मुलगी एकटी असल्याचं पाहून त्याने घरात प्रवेश केला आणि आतून दरवाजा बंद करुन बलात्कार केला. त्याच वेळी मुलीने विरोध करून आरडाओरडा केला.

मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर पुढच्या खोलीत झोपलेला मुलीचा भाऊ जागा झाला. तसेच आजूबाजूला लोक देखील जमा झाले. यावेळी आरोपी घाबरुन पलंगाखाली लपला होता. जमलेल्या लोकांनी आरोपीला बाहेर काढून त्याला बेदम मारलं.

दरम्यान, पीडितेच्या जबाबावरून आरोपीविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. सध्या त्या दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तेथे दोघांचीही वैद्यकीय तपासणी चालू आहे.

थोडक्यात बातम्या- 

तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने एकाची हत्या; अहमदनगरमधील धक्कादायक घटना

कडक सॅल्यूट! पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट

केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार?

‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ

कोरोनाची लस जगात सर्वात आधी घेणाऱ्या ‘विल्यम शेक्सपिअर’चा मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More