बीड | मराठा आरक्षणाचं केंद्र आता परळी झालं आहे, त्यामुळे सरकारने इतर लोकांशी बोलू नये, असं जाहीर करण्यात आलंय. मराठा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी ही भूमिका जाहीर केलीय.
मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. यावर अजूनही तोडगा निघत नाहीये. सरकारने इतर मराठ्यांशी चर्चा न करता परळीतील मराठ्यांशी चर्चा करावी, असं आबासाहेब पाटील यांनी म्हटलंय.
दरम्यान, परळीतील ठिय्या मोर्चानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं. अजूनही परळीत मराठा समाजाचा ठिय्या मोर्चा सुरु आहे. त्यामुळे आता परळीच मराठा मोर्चाचं केंद्र मानलं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी
-दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार
-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल
-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा
-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल