शिक्षणमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘आधार’सक्ती, अजब निर्णयाची चर्चा

Vinod Tawade
शिक्षणमंत्री विनोद तावडे

नागपूर | शिक्षणमंत्री विनोद तावडे नागपुरातील शिक्षकांशी येत्या सोमवारी संवाद साधणार आहेत. मात्र या बैठकीला येताना शिक्षकांना आधार कार्ड किंवा पॅनकार्ड आणणे अनिवार्य केले आहे.

तावडे 5 आणि 6 फेब्रुवारी दरम्यान नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी ‘संवाद सेतू’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पहिल्या दिवशी भंडारा, गोंदिया तर दुसऱ्या दिवशी नागपूर, गडचिरोली आणि वर्धा येथील शिक्षकांना बैठकीला बोलवण्यात आले आहे. मात्र या बैठकीला आधारसक्ती केल्याने याची एकच चर्चा आहे.