मी कालच आगीची भीती व्यक्त केली होती- आदित्य ठाकरे

मुंबई | मी कालच याठिकाणी आलो होतो. तेव्हा मी इथल्या अग्नीशमन यंत्रणेबद्दल शंका व्यक्त केली होती, असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 

मुंबईच्या कमला मिलमध्ये लागलेल्या आगीची आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

महापौरांची भेट घेऊन आपण यासंदर्भात शक्यता व्यक्त केली होती. कमला मिल, तोडी मिल आणि रघुवंशी मिल याठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास फायर इंजिनला देखील घुसण्याची जागा नाही. त्यामुळे तिथे फायर ऑडिट होणं गरजेचं होतं, असं त्यांनी सांगितलं.