Top News महाराष्ट्र मुंबई

आप्पा, तुम्ही अजूनहीआमच्यातच आहात, धनंजय मुंडेंनी गोपीनाथ काकांना केलं अभिवादन

मुंबई | भाजपचे दिगवंत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं आहे. यातच गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनीही त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे.

‘आप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’,असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

तसेच तुमच्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ काकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 80 व्या जन्मदिनानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.


थोडक्यात बातम्या-

पंकजा मुंडेंनी घटवलं तब्बल 14 किलो वजन; पाहा कसं आहे डेली रुटीन!

‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत

गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या!

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या