Loading...

आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

नवी दिल्ली | समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या एका वक्तव्याने आज लोकसभेत चांगलाचा राडा झाला. लोकसभा उपाध्यक्ष रमा देवी कामकाज सांभाळत असताना हा प्रकार घडला.

तुम्ही मला इतक्या चांगल्या वाटता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघतच राहावेसे वाटते. मला मुभा मिळाली तर मी कधी तुमच्यावरून नजर हटवणार नाही, असं ते म्हणाले.

Loading...

केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आझम खान यांच्या या वक्तव्यावर तात्काळ आक्षेप घेतला. आझम खान यांनी या वक्तव्यासाठी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसभेच्या उपाध्यक्ष रमा देवी यांनीही आझम खान यांना फैलावर घेतलं. अशाप्रकारे बोलणे योग्य नाही. कृपया तुम्ही स्वत:चे शब्द मागे घ्या, असं त्यांनी म्हटलं.

Loading...

दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही आझम खान यांना माफी मागण्याचा आदेश दिला. यावर रमा देवी मला बहिणीसारख्या आहेत, अशी सारवासारव आझम खान यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Loading...

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

-अहिरांनी राष्ट्रवादी सोडली अन् पक्षाने लगोलग या नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड केली!

-“शरद पवार शिवसेनेत येतील असं वाटत नाही”

-“अहिर जरी सेनेत आले असले तरी वरळीचा पुढचा आमदार मीच…”

ब्राह्मणांमध्येच खास गुण असतात; केरळ हायकोर्टाच्या न्यायाधीशाचा दावा

Loading...