बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Mr 360 चं वर्तुळ पुर्ण; महान खेळाडू एबी डिव्हिलीयर्सची क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली | द. आफ्रिका संघाचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने त्याच्या चाहत्यांना धक्का देत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. Mr 360 अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या एबीडीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

हा एक अविश्वसनीय प्रवास होता पण मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतके वर्ष मी हा खेळ निखळ आनंदाने आणि अव्याहत उत्साहाने खेळलो पण आता वयाच्या 37व्या वर्षी मी इतक्या तेजस्वीपणाने खेळू शकत नाही, असं एबीडिने ट्विट करत लिहिलं आहे.

हेच वास्तव आहे आणि मी ते स्वीकारलं पाहिजे, असं म्हणत एबीडिने त्याचा प्रत्येक टीममेट, कुटुंब, सगळे प्रतिस्पर्धी, प्रशिक्षक, फिजीओ, कर्मचारी सगळ्यांचे आभार मानले आहेत. तर द. आफ्रिका, भारत मी जिथे जिथे खेळलो तिथे मला मिळालेल्या समर्थनामुळे मी नम्र असल्याचंही एबीडि याने लिहिलं आहे.

टायटन्स, प्रोटीज कींवा आरसीबी यांनी मला अकल्पित अनुभव आणि संधी दिल्या आहेत आणि मी त्यासाठी नेहमीच कृतज्ञ असल्याचं एबीडीने लिहिलं आहे. तर अशी भावनिक पोस्ट शेअर करत एबीडिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. आयपीलच्या सगळ्या सिजनमध्ये एबीडि आरसीबी संघाकडून खेळला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“वर्षभर आधीच हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”

‘तोपर्यंत घरी जाणार नाही’; नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर आंदोलक शेतकरी ठाम

नरेंद्र मोदींच्या तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले….

हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली; ‘या’ दिग्दर्शकाला करतेय डेट

“झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अखेर शेतकऱ्यांनी करून दाखवलं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More