बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रुग्णांसाठी भन्नाट कल्पना; कोविड सेंटरमध्येच उभारलं ग्रंथालय

मुंबई | कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा उत्तम वापर दुसरा काय असू शकतो. याच विचारातून लेटस रीड फाऊंडेशनने व्यापक वाचक चळवळ राबविणाऱ्या संस्थेच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन कोविड सेंटरमध्ये एक अतिशय वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. याठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचं उत्तम ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका आणि लेटस रीड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोरोना रूग्ण ताणतणावापासून मुक्त राहावेत. त्यांच्यामध्ये सकारात्मक उर्जा कायम राहावी. या उद्देशाने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे.

पुस्तकांच्या निवडीवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. हलकीफुलकी मनोरंजक पुस्तके तसेच प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारे ग्रंथ अशा विविध आशयाची व नामवंत लेखकांची पुस्तके याठिकाणी ठेवण्यात आली आहेत. देशातला पहिला प्रयोग करण्यात आला आहे. देश कोविडमुक्त व्हावा आणि वाचनाचा संसर्ग वाढावा यासाठीचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दरम्यान, आयुक्तांनी याबाबत संस्थेचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. पुस्तकांच्या निवडीचे कौतुकही त्यांनी केलं. येथील रूग्णांशी संवाद साधताना काही रूग्ण स्वत:सोबत घरून वाचण्यासाठी पुस्तकं घेऊन आल्याचंही आढळलं. त्यांच्याशीही आयुक्तांनी चर्चा केली होती.

थोडक्यात बातम्या-

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू जडेजा यांचं कोरोनानं निधन

दिलासादायक बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, दशक्रिया विधीचा पोस्टर पाहून महाराष्ट्र हळहळला

बाबो! पाकिस्तानमध्ये चक्क पंतप्रधान इम्रान खान यांच्याच अटकेची मागणी

मांसाहार करा म्हणणाऱ्या संजय गायकवाडांनी रुग्णांना चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी वाटली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More