बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!

सांगली | सांगलीत आर. आर. आबांच्या(R.R.Patil) जाण्याने राजकारणात मोठी निराशा निर्माण झाली होती. अशातच आता आबांचे पुत्र रोहित पाटील(Rohit R.R. Patil) राजकारणात सक्रिय झाल्याने आबांच्या कार्यकर्त्यांना मोठा आधार आला आहे. रोहित पाटील हे देखील आबांप्रमाणेच राजकारणात यशस्वी होत असल्याचं पहायला मिळत आहे. रोहित यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला(NCP) अजून एक दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील किरदवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी पार पाडली. त्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या रोहित पाटील यांनी किरदवाडी ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता मिळवली आहे. रोहित यांच्या पॅनलच्या सात पैकी सात उमेदवार निवडून आले आहेत. यापूर्वी कवठेमहांकाळ नगरपरिषदेतही रोहित पाटलांना दणदणीत विजय मिळाला होता.

किरदवाडीत रोहित पाटलांना विरोधक हे भाजप पक्षाचे खासदार संजयकाका पाटील(Sanjaykaka Patil) हे होते. संजयकाका यांचा उमेदवार सातपैकी एकाही जागी निवडूण न आल्याने संजयकाका आणि भाजपसाठी हा मोठा हा धक्का बसला आहे. या निवडणूकीत  दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु यात रोहित पाटील यांनी बाजी मारली.

दरम्यान, कवठेमहांकाळ नगरपंचायतीतून रोहित पाटलांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला होता. या निवडणूकीत विजय झाल्यानंतर त्यांनी एक भावनिक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी आबांची आठवण मनात दाटून येत आहे, आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल असं त्यांनी म्हटल होतं. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले होते.

थोडक्यात बातम्या-

आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जदारांना धक्का

उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; शिवसेनेचा भाजपला जोर का झटका

‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More