बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने नाकारली भारतीय प्रशिक्षकपदाची ऑफर

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी अनेक महान खेळाडूंची नावे चर्चेत आहेत. अलिकडेच भारताचा माजी खेळाडू आणि 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडकडे मुख्य संघाची जबाबदारी देणार असल्याचं समजत आहे. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलिया संघाला 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराने प्रशिक्षकपदाची ऑफर नाकारली असल्याचं सांगण्यात येत आहे.

बीसीसीआयकडून परदेशी आणि भारतातील खेळाडूंची प्रशिक्षक पदासाठी चाचपाणी करण्यात आली होती. यामध्ये अनेक मोठमोठ्या खेळाडूंची नावे चर्चेत होती. यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला देखील बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी ऑफर दिली होती. मात्र  प्रशिक्षकपदाची ऑफर पॉन्टिंगने नाकारली आहे.  यासंदर्भात ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने माहिती दिली आहे.

रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 साली विश्वचषक जिंकला होता. ऑस्ट्रेलिया संघात एक धाकड खेळाडू म्हणून पॉन्टिंग गणला जात असे. सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची धूरा पॉन्टिंगकडे असून या हंगामात दिल्लीचा संघ सर्वात वरच्या स्थानी होता. परंतु सेमीफायनलमध्ये चेन्नई संघाकडून दिल्लीला हार पत्करावी लागली.

दरम्यान, रवी शास्त्रीनंतर भारताचा प्रशिक्षक कोण होणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागून होतं. परंतु बीसीसीआयने राहुल द्रविडकडे भारताच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयने द्रविडसोबत 2 वर्षाचा करार केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

T-20 विश्वचषकापुर्वीची ‘ती’ एक चूक अन् पाकिस्तानला मागावी लागली बीसीसीआयची माफी

कोरोना लस न घेण्याचा निर्णय आला ‘या’ अभिनेत्रीच्या अंगलट, वाचा सविस्तर

‘या’ कारणामुळे भारतीय हवाई हद्दीत घुसलं शेजारील देशाचं विमान

महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने रचला इतिहास, केलं 100 टक्के लसीकरण पुर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More