महाराष्ट्र रायगड

“शुगर वाढली की राणे काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही”

रायगड | बीपी, शुगर वाढली की, काय आणि कसं बोलतात हे नारायण राणेंनाच कळत नाही, असं म्हणत राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी राणेंवर टीकास्त्र  सोडलंय.

हिंदुत्ववादी संघटनांमार्फत कांगावा करून, भाजप शिवसेनेला बदनाम करण्याचं काम नियोजनबद्ध पद्धतीने करीत असल्याची टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या वारस आहेत. त्या सेनेत आल्यास त्यांचं स्वागतच होईल. शिवसेनेशी केलेल्या गद्दारीचे भोग आगामी निवडणुकांमध्ये भाजपला भोगावे लागतील, असंही सत्तारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान न करता, भाजपने गद्दारीच केली, याची जाहीरपणे कबुली रावसाहेब दानवे यांनीच दिली असल्याचं सांगत, सत्तारांनी दानवेंच्या भाषणाची व्हिडीओ क्लिपच पत्रकारांना दाखवली.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले

‘…तोपर्यंत आम्ही एकत्र’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्

“आघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं”

“चला घेऊ छत्रपतींचा आशिर्वाद म्हणणारे सत्तेत आल्यावर छत्रपतींना विसरले”

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला हा महत्वाचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या