अमरावती | भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्यामुळे माझ्या वडिलांचा पराभव झाला, असा आरोप शिवसेनेचे पराभूत नेते आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांनी केला आहे.
निवडणुकीदरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजप नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी कामं केली नाही, असं आभिजित यांनी म्हटलं आहे.
अमरावतीत शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादी रिपाइं आघाडीच्या नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळांचा तब्बल 36 हजार मतांनी पराभव केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-पराभवाने खचून जायचं नाही… पुन्हा लढाचयं; अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना सकारात्मक इंजेक्शन
-कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही- अजित पवार
-जयकुमार गोरे भाजपमध्ये प्रवेश करणार का?? त्यावर गोरे म्हणतात…
-आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो विराट सर्वोत्तम खेळाडू; पण विराटला ‘ही’ गोष्ट सहन होत नाही
-शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेच्या खासदाराला पाडलं- चंद्रकांत पाटील
Comments are closed.