बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार भिजल्याची बातमी झाली, पण…”; ‘या’ नेत्याचा पवारांवर हल्लाबोल

उस्मानाबाद | भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट शरद पवारांवर हल्ला चढवल्याचं आज तुळजापूर येथे पाहायला मिळालं. औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा ते तुळजापूर असं पायी दिंडीचं आयोजन केलं होतं. तसेच यावेळी त्यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला.

अभिमन्यू पवार यांनी झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी यासाठी पायी दिंडीचं आयोजन केलं होतं. यावेळी शरद पवार हे पावसात भिजले त्याची बातमी झाली तसेच शेतकरी भिजतोय त्याचीही बातमी झाली, पण शरद पवारांना शेतकरी भिजतोय हे पाहण्यासाठी वेळच नाही, असा टोला अभिमन्यू पवार यांनी लगावला आहे.

औसा ते तुळजापूर आयोजित केलेल्या दिंडीचं तुळजापूरात आज आगमन झाल्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्य सरकारला सुबूद्धी देऊन या सरकारमधून खाली उतरवण्याचं साकडं घातलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रूपये मिळावे अशी मागणी केली होती. दरम्यान, या मागणीला अभिमन्यू पवार यांनी पाठिंबा दर्शवत अशोक चव्हाणांच्या मागणीकडे कोणी लक्ष देत नाही. त्यांच्या मागणीला कुणीही विचारत नाही, असं म्हणत सरकारसह शरद पवारांवरही टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या

आर्यन खानचं समुपदेश केलं मग पुरावे द्या! नवाब मलिकांचं NCB ला खुलं आव्हान

“….म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

मुंबईतील कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More