बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप व्हायरसविरोधात ममता बॅनर्जी नावाची लस प्रभावी”

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये अलिकडेच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे. या पोटनिवडणुकीतील स्टार प्रचारक असलेले तृणमुल काॅंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे आता पक्षाने राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. कुचबिहारमधील दिनहटा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

कोरोना व्हायरस विरोधात ज्याप्रमाणे कोव्हिडशिल्ड लस प्रभावी आहे. त्याचप्रमाणे देशात भाजप व्हायरसविरोधात ममता बॅनर्जी नावाची अत्यंत प्रभावी लस आहे. तसेच 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी या भाजपचा सुपडासाफ करतील, असंही अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार बॅनर्जी सध्या इतर राज्यांमध्ये तृणमूल काॅंग्रेस पक्ष वाढीसाठी काम करताना दिसत आहे. त्रिपुरा, आसाम आणि गोव्यात या पक्षाने काम करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी हे 28 ऑक्टोबर रोजी गोव्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मागील झालेल्या भवानीपूर मतदार संघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काॅंग्रेसने घवघवीत यश प्राप्त केलं आहे. त्यामुळे सध्या दिनहाट मतदारसंघातील पोटनिवडणुकीत देखील आम्ही एकहाती विजय मिळवू, असा विश्वास अभिषेक बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

अन् भर कार्यक्रमात पुरूषाने चक्क गव्हर्नरच्या कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…तर शेतकऱ्यांना 4000 कोटी मिळाले असते”

‘तुम्ही प्रवाहाच्या विरूद्ध पोहता तेव्हा…’; साईलच्या आरोपानंतर क्रांती रेडकरचं प्रत्युत्तर

ड्रग्स प्रकरणावर राज्यपाल कोश्यारीचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

फाडफाड इंग्रजी शिकायचीय?, मग Google करेल तुमची मदत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More