बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! प्रेमविवाहानंतर गर्भपात न केल्यानं महिलेवर अत्याचार

औरंगाबाद | प्रेमविवाह केल्यानंतर इच्छा नसतानाही बायकोला वारंवार गर्भपात करण्यासाठी बळजबरी केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. आरोपी पतीनं यापूर्वी त्याच्या बायकोला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडलं होतं. त्यानंतरही आरोपीनं गर्भपात करण्याचा तगादा लावला होता. मात्र, यावेळी पीडित महिलेनं गर्भपात करण्यास नकार दिल्यानं पतीनं तिला मारहाण करून घराबाहेर काढलं. याप्रकरणी पीडित महिलेनं आरोपी पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचारासोबत मनाविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी पतीचं नाव आशिष गोरे असून त्याचं 2007 पासून पीडित महिलेशी प्रेमसंबंध होते. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. पण आरोपी आशिषनं तिला गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडलं. हा प्रकार दोनदा तिच्यासोबत घडला. त्यामुळं पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल करेल अशी धमकी दिली. तेव्हा आरोपी आशिषनं पीडितेशी कोर्टात जाऊन नोंदणी पद्धतीनं 2018 मध्ये लग्न केलं.

लग्नानंतर आता तुला बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही, असं म्हणत आरोपीनं पीडितेला गर्भपात करण्यास भाग पाडत होता. गर्भपात करण्यासाठी नकार दिल्यानं आरोपी पतीनं तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तर त्यानं त्याच्या घरीही तिला नेलं नाही आणि मारहाण करून संसार करण्यासही नकार दिला. त्यामुळं पीडित महिलेनं सततच्या त्रासाला कंटाळून वेदांतनगर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी आशिष गोरे याला अटक केली आहे. कौटुंबीक हिंसाचार आणि बलात्कारासह अन्य कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

“…त्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा लवकरच करतील”

प्रसिद्ध जेष्ठ संगीतकार विजय पाटील यांचं निधन!

‘कोरोना लसींमुळेच…’; नोबेल पुरस्कार विजेत्या साथरोग तज्ज्ञाचा खळबळजनक दावा

पुणे हादरलं! शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडून 15 वर्षीय मुलीवर बलात्कार

‘2 महिन्याच्या बाळाला आईचं दूध हवंय’; भूमी पेडणेकरने केली ब्रेस्ट मिल्कची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More