बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्विटरवर जगातील दुसरे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

नवी दिल्ली | कंझ्युमर इंटेलिजन्स कंपनी ब्रॅंडवॉचने नुकतच त्यांचं वार्षिक सर्वेक्षण जाहीर केलं आहे. त्यानुसार ट्वीटरववरील 50 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत भारताचे पंतप्रधान हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा 35 व्या क्रमांकावर आहे.

या यादीत अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट हिला पहिला क्रमांक मिळाला आहे. मिशेल ओबामा, लिओनार्डो डिकॅप्रियो हे मात्र यावर्षी यादीत मागे पडल्याचं पाहायला मिळालं. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडूलकर याने यावेळी अनेक खेळाडूंना मागे टाकत ट्विटरवरील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत 35 वे स्थान मिळवलं.

एकदंरीतच मनोरंजन, राजकीय त्याचबरोबर खेळ या क्षेत्रातील प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींचा या यादित समावेश असतो. सामजिक क्षेत्रात केलेलं कार्य, चाहते, जागतिक ब्रॅंडसोबत असलेल्या भागिदारी या सर्व बाबींच्या अनुषंगाने सचिन तेंडूलकर, टेलर स्विफ्ट यासांरख्या प्रसिद्ध व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

सचिन तेंडूलकर हा अनेक दिवसांपासून युनिसेफमध्ये सक्रिय आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी फंलदाज असून राज्यसभेचा सदस्य देखील आहे. त्याचबरोबर सचिनला यापूर्वी दक्षिण आशियाचा दुत म्हणून देखील निवडण्यात आलं आहे. त्याने खेळाबरोबरच अनेक सामाजिक कार्यात हातभार लावून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आधी लस घ्या मगच पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळवा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

“नारायण राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही”

“शरद पवारांनाही कळू द्या त्यांचे मंत्री काय कांड करतात ते”

‘या’ बँकेवर RBI ची कारवाई; जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला…

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More