बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो’ एक व्हाट्सअॅप मेसेज अन् गोल्डनमॅन दत्ता फुगेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक

पुणे | पुण्यातील गोल्डनमॅन दत्ता फुगे आपल्या सोन्याच्या शर्टामुळे जगभर प्रसिद्ध होते. दत्ता फुगे यांची आर्थिक व्यवहारातुम 15 जुलै 2016 ला दिघी परिसरात हत्या झाली होती. येत्या जुलै महिन्यात त्यांच्या हत्येला पाच वर्ष पुर्ण होतील. अशातच दत्ता फुगेंची हत्या करणाऱ्या एकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली.

प्रमोद उर्फ कक्का धौलपुरी असं संबंधित आरोपीचं नाव आहे. दत्ता फुगेच्या हत्ये प्रकरणी शिक्षा भोगत असलेला धौलपुरी पॅरोलवर बाहेर आला असल्याचं कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं. बाहेर आल्यावर त्याने भोसरी परिसरात पुन्हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे पिस्तुल होतं आणि हे पिस्तुल अनेकांनी पाहिलं होतं. मात्र त्याच्या भातीपोटी याबाबत कोणीही पोलिसांना माहिती दिली नाही.

धौलपुरीला लोक घाबरत होते मात्र एका सुजान नागरिकाने त्याच्याबाबतची माहिती आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिली. नागरिकाने कृष्ण प्रकाश यांना व्हाट्सअॅप मेजेस केला आणि त्याच्याजवळच्या पिस्तुलबाबत माहिती दिली. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी पाठवून मोठ्या शिताफीने धौलपुरीयाला अटक केली. त्याला अटक केल्यावर पोलिसांनी 3 देशी पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

दरम्यान, फक्त एका मेसेजवरून पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी लोकांना शहरात कुठेही गुन्हा किंवा गैरप्रकार घडत असेल तर मला संपर्क करा, असं आवाहन केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅबसह झुंबर कोसळलं, आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले

आजी कोरोना सेंटरमध्ये ऐवढी रमली की, कोरोना टेस्ट निगेटिव्ह येऊनही घरी जाण्यास दिला नकार

आनंदाची बातमी! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, वाचा दिलासादायक आकडेवारी

‘काँग्रेसला ‘स्वबळा’वर लढूनच जर सत्ता आणायची असेल तर….’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

चाहत्यांना सुखद धक्का! अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाहबंधनात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More