“छ. संभाजी महाराजांना स्त्रियांचा आणि दारुचा व्यसनी म्हणणाऱ्या गोळवलकरांचा चंद्रकांत पाटील निषेध करणार का?”
मुंबई | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत. औरंगजेबाचे नाहीत त्यामुळे औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ झालंच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं आहे.
छ.संभाजी महाराजांना स्त्रियांचा व दारुचा व्यसनी म्हणून त्यांची खंडो बल्लाळाच्या बहिणीवर वाईट नजर होती अशी त्यांची बदनामी करणाऱ्या गोळवलकरांचा मी जाहीर निषेध करतो, असं म्हणत चंद्रकांत दादा तुम्ही निषेध करणार का?, असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.
जर गोळवळकरांच्या वक्तव्याचा निषेध आपण करणार नसाल तर संभाजी महाराजांचे नाव घेण्याचा भाजपला अधिकार नाहीये, असंही सावंत यांनी म्हटलं आहे. बाबात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल आहे. त्याला गती देऊन शहराचे नाव बदलले पाहिजे, असं औरंगाबादच्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
छ.संभाजी महाराजांना स्त्रियांचा व दारुचा व्यसनी म्हणून त्यांची खंडो बल्लाळाच्या बहिणीवर वाईट नजर होती अशी त्यांची बदनामी करणाऱ्या गोळवलकरांचा जाहीर निषेध! चंद्रकांत दादा तुम्ही निषेध करणार का? नाही तर संभाजी महाराजांचे नाव घेण्याचा @BJP4Maharashtra ला अधिकार नाही. https://t.co/mUveFUo86m pic.twitter.com/znzxD7AuTK
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 29, 2020
महाराष्ट्रा चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत.औरंगजेबाचे नाहीत,त्यामुळे औरंगाबादचे नामकरण “संभाजीनगर”झालंच पाहिजे.
-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलhttps://t.co/9EqQbdlosV— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 29, 2020
ट्रेंडिंग बातम्य
“आम्ही महाराजांचे वंशज आहोत औरंगजेबाचे नाही त्यामुळे औरंगाबादं नाव ‘संभाजीनगर’ झालंच पाहिजे”
रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात पुन्हा खडाजंगी, पाहा काय आहे प्रकार…
महत्वाच्या बातम्या-
सरककारने केलेली कर्जमाफी म्हणजे जखम टोंगळ्याला अन् पट्टी मस्तकाला; बच्चू कडूंचा घरचा आहेर
बळीराजाला सुखावणारी बातमी; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
घरवापसी केलेल्या जुन्या भिडूवर राज ठाकरेंनी सोपवली नवी जबाबदारी
Comments are closed.