टिळकांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला अॅसिड हल्ल्याची धमकी!

पुणे | काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेला अज्ञाताकडून अॅसिड हल्ला करण्याची धमकी देण्यात आलीय. पीडित महिलेनं स्वतः यासंदर्भात तक्रार केलीय. 

रोहित टिळक यांनी आपल्याला धमकावून बलात्कार केल्याची तक्रार पीडितेनं विश्रामबाग पोलिसात दिली होती. याप्रकरणी रोहित टिळक सध्या जामिनावर बाहेर आहेत.

दरम्यान, पीडितेनं टिळक यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यावेळी तिने आंदोलन केलं नाही. आपल्याला धमक्या येत असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.